ग्राहकांच्या सोयीसाठी

मोबाईल ए.टी.एम. व्हॅन

मोबाईल ए.टी.एम. व्हॅन प्राप्त झालेपासून या बँकेने ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी पूर्ण बैंकींग सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. यामध्ये ए.टी.एम. व्दारे पैसे काढणे, मायक्रो ए.टी.एम. मशिनव्दारे पैसे भरणे/पैसे काढणे, पासबुक भरून देणे, नविन खाते उघडणे, निराधारांचे पेमेंट करणे तसेच शासनाच्या वेळोवेळी बँकींग क्षेत्रातील नियमांबद्दल माहिती देणे इत्यादीचा समावेश आहे.

मोबाईल ए.टी.एम. व्हॅनमध्ये बँकींगच्या सर्व सुविधा उपलब्ध असून यामध्ये बँकींग काऊंटर, तिजोरी, ए.टी.एम. मशिन, संगणक, प्रिंटर, स्कॅनर, एलईडी संच, एलईडी डिस्प्ले बोर्ड, माईक, एअर कंडीशनर, युपीएस, जनरेटर, अशा सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध आहेत. त्यामुळे "उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपल्या दारी" या उपक्रमाअंतर्गत बँकींगच्या सेवा ग्राहकांना कोणत्याही ठिकाणी, कुठेही देणे शक्य झाले आहे.



मोबाईल ए.टी.एम. व्हॅनव्दारे गावपातळीवर निराधारांना अनुदान वाटप :

मोबाईल ए.टी.एम. व्हॅनचे लोकार्पण पार पडलेनंतर या बँकेने ग्रामीण भागातील वयोवृध्द, निराधार, अपंग ग्राहकांना शासनामार्फत मिळणारे अनुदान संबंधितांना "उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपल्या दारी" या उपक्रमाअंतर्गत गावपातळीवर जाऊन वाटप करण्यास सुरवात केली. ती अद्यापही चालू आहे.

साल सन २०१९
१) माहे जानेवारी २०१९ या महिन्यामध्ये ०४ गावांमध्ये ५ दिवस प्रत्यक्ष जाऊन ग्राहकांना सेवा देण्यात आली.
२) माहे फेब्रुवारी २०१९ या महिन्यामध्ये १० गावांमध्ये ७ दिवस प्रत्यक्ष जाऊन ग्राहकांना सेवा देण्यात आली.
३) माहे मार्च २०१९ या महिन्यामध्ये १९ गावांमध्ये ८ दिवस प्रत्यक्ष जाऊन ग्राहकांना सेवा देण्यात आली.
४) माहे नोव्हेंबर २०१९ या महिन्यामध्ये मेडसिंगा या गावामध्ये १ दिवस प्रत्यक्ष जाऊन ग्राहकांना सेवा देण्यात आली.

साल सन २०२०
१) माहे जानेवारी २०२० या महिन्यामध्ये ०४ गावांमध्ये ५ दिवस प्रत्यक्ष जाऊन ग्राहकांना सेवा देण्यात आली.
२) माहे फेब्रुवारी २०२० या महिन्यामध्ये ०२ गावांमध्ये २ दिवस प्रत्यक्ष जाऊन ग्राहकांना सेवा देण्यात आली.
३) माहे मार्च २०२० या महिन्यामध्ये १६ गावांमध्ये ९ दिवस प्रत्यक्ष जाऊन ग्राहकांना सेवा देण्यात आली.
४) माहे एप्रिल २०२० या महिन्यामध्ये १९ गावांमध्ये ९ दिवस प्रत्यक्ष जाऊन ग्राहकांना सेवा देण्यात आली.
५) माहे मे २०२० या महिन्यामध्ये २७ गावांमध्ये १५ दिवस प्रत्यक्ष जाऊन ग्राहकांना सेवा देण्यात आली.

साल सन २०२१
माहे जुलै २०२१ या महिन्यामध्ये ०८ गावांमध्ये ४ दिवस प्रत्यक्ष जाऊन ग्राहकांना सेवा देण्यात आली. तरी अशा प्रकारे या जिल्हा बँकेच्या मोबाईल एटीएम व्हॅनव्दारे या जिल्हा बँकेच्या कार्यक्षेत्रातील किमान १०० खेडो-पाड्यांमध्ये जाऊन तसेच गावोगावी असणा-या बाजारपेठा, जत्रा या ठिकाणी मोबाईल एटीएम व्हॅनव्दारे जवळपास ५० हजार शेतकरी, निराधारांना बँकींग सेवा देण्यात आलेली आहे.



कोव्हीड-१९ विषाणूसंसर्गाचे कालावधीत मोबाईल ए.टी.एम. व्हॅनचा वापर :

बँकेचे चेअरमन श्री. सुरेश बिराजदार, बँकेचे व्हाईस चेअरमन श्री. कैलास शिंदे मा.संचालक मंडळ व कार्यकारी संचालक श्री. विजय घोणसे पाटील यांनी नाबार्डकडे सतत पाठपुरावा करून नाबार्डकडून मोबाईल ए.टी.एम. व्हॅन, मायक्रो ए.टी.एम. बँकेसाठी अनुदानावर मिळविले आहे. कोव्हीड-१९ विषाणूसंसर्गाचे कालावधीत (सन २०२०) कोरोना विषाणूसंसर्गामुळे सोशल डिस्टन्सींगचे व कोरोनाच्या नियमाचे पालन करून शासनाच्या योजना जसे की, संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना, विधवा पत्नी निराधार योजना इ. योजनेचे लाभार्थीचे अनुदान जिल्हा बँकेत जमा होते. सदर अनुदानाचे वाटप संबंधित लाभार्थ्याचे गावात तसेच संबंधितांचे घरोघरी जाऊन केलेले आहे.

कोव्हीड-१९ विषाणूसंसर्गाचे कालावधीत बँकेच्या दैनंदीन कामकाजाचे कालावधीस मर्यादा निर्माण झाल्यामुळे निराधारांचे अनुदान संबंधित लाभार्थ्यांना वितरीत करण्यास अवधी कमी पडत होता. तसेच लॉकडाऊनमुळे प्रवास करण्यास देखील मर्यादा येत होत्या. या उद्भवलेल्या अडचणीवर मात करत उस्मानाबाद जिल्हा बँकेने उमरगा तालुक्यातील शाखेअंतर्गत असणा-या गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन निराधार लाभार्थ्यांचे अनुदान वितरीत केलेले आहे.

तसेच यावर्षीही (सन २०२१) बँकेचे चेअरमन श्री. सुरेश बिराजदार व बँकेचे कार्यकारी संचालक श्री. विजय घोणसे पाटील यांनी बँक आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यासाठी बँकेच्या कर्मचा-यांना आव्हान केले व ते आव्हान बँकेच्या कर्मचा-यांनी कोरोना विषाणूसंसर्गाचे नियमाचे पालन करून शासनाच्या अनुदानाचे वाटप लाभधारकांना त्यांच्या गावी जाऊन त्यांच्या घरी जाऊन केले आहे. याचीदेखील नोंद प्रसार माध्यमांनी घेतलेली आहे. अशा प्रकारे बँकींग सेवा पुरविणारी राज्यातील पहिली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणून उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा नावलौकीक सुध्दा झाला आहे.

या बँकेने दि. ०१ जुलै २०२१ ते १० जुलै २०२१ या कालावधीत जिल्ह्यामध्ये नाबार्डचे दि.१२ जुलै २०२१ रोजीचे वर्धापन दिनाचे औचित्य साधून आर्थिक साक्षरता अभियान राबविले आहे. या अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण तसेच नागरी भागामध्ये राष्ट्रीय बँकेमार्फत राबविल्या जाणा-या विविध योजनांची माहिती पोहचविण्याचे काम या बँकेने यशस्वीरित्या पार पाडले आहे.

या अभियानाकरीता या बँकेस मोबाईल ए.टी.एम.व्हॅनचा विशेष असा उपयोग झालेला आहे. बँकेने जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये जाऊन बँकींग सेवेची माहिती तसेच नाबार्डचे योजनांविषयीची माहिती मोबाईल ए.टी.एम. व्हॅनमार्फत पुरविलेली आहे.